News & Events
पूरग्रस्तांना दिलासा – अकोला अर्बन बँकेकडून ४.५१ लाखांचा मदतीचा हात
July 27, 2026
अकोला अर्बन बँकेकडून पूरग्रस्तांसाठी अर्थसहाय्य अकोला – राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या व्यापक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मा. मुख्यमंत्री निधी करिता अकोला मा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बँकेला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक योगदान देण्यात आले आहे. दि. अकोला अर्बन बँकेच्या वतीने एकूण ४,५१,०००/- (अक्षरी – चार लाख एक्कावन्न हजार रुपये फक्त) रक्कमेचा धनादेश अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. बँकेच्या ४६६ कर्मचाऱ्यांनी व संचालक मंडळाच्या सदस्यांनी आपले योगदान देत ही रक्कम उभारण्यात आली आहे. ही मदत बँकेचे अध्यक्ष शंतनु जोशी व मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांच्या हस्ते अकोला जिल्हाधिकारी मा. वर्षा मीना.यांना प्रदान करण्यात आली. दि अकोला अर्बन बँक ही केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून सामाजिक कार्यातही नेहमीच पुढाकार घेत असते, याचेच हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. बँकेच्या या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी हे आर्थिक योगदान उपयुक्त ठरणार आहे. या प्रसंगी बँकेचे अधिकारी महेश जोशी व समीर थोडगे हे उपस्थित होते.