News & Events
अकोला अर्बन बँकेला राष्ट्रीय स्तराचे तिन पुरस्कार प्राप्त
July 23, 2026
बँकिंग फ्रंटीयरच्या वतीने लखनऊ येथे संपन्न कार्यक्रमात विदर्भ आणि मध्यप्रदेशातील अग्रगण्य असलेल्या दि अकोला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेला "बँकिंग फ्रंटीयर अवार्ड तर्फे सन्मानित करण्यात आले.
लखनऊ येथे दि. १९ ऑक्टोबर, २०२४ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात अकोला अर्बन बँकेला १) Best Co-operative Bank, २) Best KYC Initiative व ३) Best Reporting/MIS Initiative या तिनही कॅटेगरी मध्ये पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाला बँकेचे सचिव हरिष लाखाणी, संचालक संजय कोटक, राहुल राठी तसेच बँकेचे अधिकारी व CISO प्रशांत अरबट, चिफ मॅनेजर सुनील शेजोळे, मॅनेजर योगेश निर्हाळे उपस्थित होते.
याशिवाय अभिमानाची बाब म्हणजे बँकेला नुकतेच Banking Operation, Core Banking System Application Support, Management & Maintenance संदर्भात I T Enabled Services (ITES) करिता ISO/IEC 27001:2022 प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
बँकेला तीन मानाचे पुरस्कार व ISO प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनु जोशी व संचालक मंडळाने सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी बँकेला प्राप्त झालेल्या तीन पुरस्काराबाबत सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत सर्वांचे कौतुक करून कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने तसेच मा. संचालक मंडळाचे मार्गदर्शनात बँक उत्तरोत्तर प्रगती करत असल्याचे नमूद केले.