News & Events Image News & Events Image

सुवर्ण महोत्सवी वर्षाचे सांगता सोहळा व बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीचे लोकार्पण

सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता व कोअर बँकीग प्रणालिचा लोकार्पण सोहळा 19 जानेवारी 2014 रोजी प्रशासकीय कार्यालयात तोष्णीवाल लेआऊट, अकोला येथे संपन्न झाला. कार्यक्रमात सहकार भारतीय राज्य उपाध्यक्ष श्री सतिषजी गुप्त तसेच आमदार डॉ. रणजीत पाटील हे उपस्थित होते.

सन् 2013-14 मध्ये बँकेची स्थापना होवून 50 वर्ष पूर्ण झाल्याने सन् 13-14 बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले. यावर्षामध्ये बँकेने विविध सामाजिक उपक्रम राबविले.

बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप आणिक कोअर बँकींग प्रणालीचे लोकार्पण करतांना श्री सतिष गुप्ता यांनी असे प्रतिपादन केले की, अकोला अर्बन बँकेने कोअर बँकींग प्रणालिची सुरुवात करुन तंत्रज्ञानाच्या नव्या दालनात प्रवेश केला आहे. काळाच्या आव्हानाना समर्थपणे तोंड देण्यासाठी सुरु करण्यात आलेला कोअर बँकींग प्रणालीचा लाभ ग्राहकांना होईल. ग्राहकांना अधिक सोई सुविधा उपलब्ध होतील असा विवास श्री गुप्त यांनी व्यक्त केला. व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष बँकेचे अध्यक्ष श्री अतुलभाई गणात्रा होते. प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.श्री.रणजीत पाटील, बँकेचे उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब पाठक, जेष्ठ संचालक प्रा. श्री.रमेशजी देशपांडे यांची उपस्थिती होती. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री.शंतनू जोशी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्री. एन. भास्करन, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एल. एम. दास आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कार्यक्रमात बँकेचे संचालक, भागधारक, ग्राहक ठेवीदार तसेच कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. वंदेमातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जनकल्याण जलधारेचे उद्धाटन

बँकेच्या वतीने स्थानिक बस स्थानकाच्या परीसरात जनकल्याण जलधारेचे [पाणपोई] उद्धाटन श्रीरामनवमीचे मुहूर्तावर शुक्रवार दि 08 एप्रिल 2014 रोजी सकाळी मा.श्री अतुलभाई गणात्रा, अध्यक्ष यांच्या शुभहस्ते झाले. बस स्टॅण्डवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांची पिण्याच्या पाण्याची सहजतेने सोय व्हावी या प्रमुख उद्देशाने बॅकेने हि जलधारा सुरू केली आहे. बँकेच्या वतीने दरवर्षी बस स्थानक परिसरात प्रवाश्यांकरिता पानपोई लावण्यात येते. याचा लाभ असंख्य प्रवासी घेतात.

उद्धाटन कार्यकमाच्या वेळी व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. शंतनुजी जोशी, श्री रमेशजी देशपांडे संचालक, श्री विजयकुमारजी पनपालीया संचालक, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एल.एम. दास - व कर्मचारी प्रतिनिधी श्री संजीवजी सोमाणी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री डि.व्ही. कुऱ्हेकर व श्री. आर.एच. भट आणि स्थानिक शाखाधिकारी व कर्मचारीगण उपस्थित होते.

परीवहन मंडळातर्फे अधिकारी वाहक चालक आदी मोठया संख्येने उपस्थित होते. परीवहन मंडळाने जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल बॅके तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

उत्कृष्ट नागरी सहकारी बँक - विशेष पुरस्काराने सन्मानित

Events Image

बँकेस विदर्भ अर्बन बँक्स को-ऑप असोसिएशन द्वारा सन् 2012-13 या आर्थिक वर्षात विदर्भातील नागरी सहकारी बँकामधून सर्वाधिक ठेवी असलेली उत्कृष्ट नागरी सहकारी बँक विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विदर्भ अर्बन बँक्स को-ऑप असोसिएशन द्वारा दि.27.04.2014 रोजी नागपूर येथे आयोजीत भव्य समारंभात, रिझर्व बँकेचे जनरल मॅनेजर श्री.अभिजीत मुजूमदार (अर्बन बँक विभाग) हयांचे शुभहस्ते हा पुरस्कार बँकेच्या वतीने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री शंतनुजी जोशी व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एल.एम. दास हयांनी स्विकारला.

पुरस्कार वितरण सोहळा विदर्भ अर्बन बँक को-ऑप असोसिएशनचे अध्यक्ष श्री कैलाशचंद्रजी अग्रवाल, उपाध्यक्ष श्री यादवराव शिरपूरकर, सचिव श्री अण्णाजी मेंडजोगे, सहसचिव श्री विठ्ठलदासजी डागा, रिझर्व बँकेचे डेप्युटी मॅनेजर श्री रमेश व नागपूरचे महापौर श्री अनिलजी सोले हया मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

बँकेच्या संचालक मंडळाने या पुरस्काराचे श्रेय बँकेचे असंख्य भागधारक, ग्राहक व हितचिंतकांना दिले.

Banking Facility